Ankita – vicky jain Wedding: लगीन घटीका समीप आली! अंकिताच्या हातावर सजली विक्कीच्या नावाची मेहंदी

Ankita – vicky jain Wedding:  लगीन घटीका समीप आली! अंकिताच्या हातावर सजली विक्कीच्या नावाची मेहंदी

Ankita - vicky jain Wedding: लगीन घटीका समीप आली! अंकिताच्या हातावर सजली विक्कीच्या नावाची मेहंदी

विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. अंकिता १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान अंकिताच्या मेहंदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अंकिताच्या हातावर विक्कीच्या नावाची मेहंदी सजली आहे. वीरल भयानीने सोशल मीडियावर अंकिताच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. प्रसिद्ध सेलिब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांना अंकिताने मेहंदी कार्यक्रमासाठी आंमत्रण दिले होते. वीना नागदा यांनी विक्कीच्या नावाची फार सुंदर मेहंदी अंकिताच्या हातावर काढली आहे.

अंकिता मेहंदीच्या कार्यक्रमाला पारंपरिक लुकमध्ये दिसली. अंकिताच्या चेहऱ्यावर नवरीचा ग्लो आलेला पहायला मिळत आहे. मेहंदी आर्टिस्ट वीणा यांच्यासोबतचा फोटो अंकिताने शेअर केला आहे. ज्यात फार खुश दिसत आहे. अभिनेत्री कतरिनाच्या हातावरची मेहंदी देखील वीण नागदा यांनीच काढली आहे. वीणा यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या हातावर मेहंदी काढली आहे. अनेक सिनेमा,मालिकांमध्ये देखील वीणा यांच्या हातून मेहंदी काढली जाते.

 

मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता आणि विक्की जैन १४ डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत. मुंबईतच दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. ११ डिसेंबरला अंकिताची मेहंदी झाली. आज १२ डिसेंबरला अंकिता आणि विक्की यांचा साखरपुडा होणार आहे. १३ डिसेंबरला हळदीचा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. १४ डिसेंबरला दोघेही विवाहबद्ध होणार आहे. बॉलिवूड आणि मालिका विश्वातील अनेक कलाकार अंकिताच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.
हिंदू पद्धतीने अंकिता आणि विक्की जैन सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १४ डिसेंबरच्या संध्याकाळी लग्नाची खास रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे.


हेही वाचा – Bharti singh pregnant: भारतीने दिली गुडन्यूज; पण ते हर्षचं बाळ नाही?

First Published on: December 12, 2021 11:01 AM
Exit mobile version