घरताज्या घडामोडीBharti singh pregnant: भारतीने दिली गुडन्यूज; पण ते हर्षचं बाळ नाही?

Bharti singh pregnant: भारतीने दिली गुडन्यूज; पण ते हर्षचं बाळ नाही?

Subscribe

कॉमेडियन भारती सिंहने गर्भवती असल्याची आनंदाची बातमी काल, शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्रामवरून जाहीर केली. भारती आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी लवकरच छोटासा पाहुणा येणार आहे. तिने हे आनंदाचे क्षण एका व्हिडिओमध्ये कैद करून तो व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर शेअर केला आहे. त्यामुळे भारती या आनंदाच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच तिचे चाहते तिला आणि पती हर्षला शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

कालपासून सोशल मीडियावर भारती, पती हर्ष लिंबाचिया, जॅस्मिन भसीन, अली गोनी, जास्मिन, पुनित आणि त्याच्या पत्नीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती वजन कमी केल्यामुळे चांगलीच चर्चेत होती. मात्र आता भारती गर्भवती असल्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या आनंदाच्या बातमीचा शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘मी हे हर्षला कसे सांगू हे त्याचे बाळ नाही? कारण हे आमच्या दोघांचे बाळ आहे.’ नेहमी प्रमाणे या देखील व्हिडिओमध्ये भारतीने कॉमेडी करणे काही सोडले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

भारतीने २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो; या स्पर्धेतून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर भारतीने स्टँड कॉमेडी शो ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या शोमधून प्रेक्षकांना हसवले. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. सध्या भारती आणि तिचा पती हर्ष ‘डान्स दिवाने’ शोमध्ये धमाल करताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bipin Rawat यांच्या निधनावर आनंद व्यक्त केल्याने मल्याळम दिग्दर्शकाने इस्लाम धर्माचा केला त्याग


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -