सुशांतच्या मृत्यूनंतर ३० दिवसांनी एक्स गर्लफ्रेंड अंकिताने केली ‘ही’ पहिली पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर ३० दिवसांनी एक्स गर्लफ्रेंड अंकिताने केली ‘ही’ पहिली पोस्ट

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक महिना झाला आहे. अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने त्याच्या कुटुंबासह जवळच्या मित्रांना धक्का बसला आहे. सोबतच सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला देखील मोठा धक्का बसला आहे. अंकिता सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर आज, या अभिनेत्याच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर, अंकिताने परमेश्वराच्या फोटोने आणि नावाने पहिली पोस्ट केली आहे.

अंकिताने परमेश्वरासमोर दिवा लावल्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले- ‘चिल्ड्रन ऑफ गॉड’. या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अंकिता हळूहळू सावरत आहे. अंकिताने देवाचे नाव घेऊन एक नवीन सुरुवात केली आहे. त्याचवेळी सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनाही अभिनेत्याची आठवण झाली आहे. त्याने फोटो शेअर केला आणि लिहिले- ‘आज एक महिना झाला आहे, आता कधीच फोन येणार नाही’.

असं होतं अंकिता आणि सुशांतचं नातं

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण बॉलीवूड व देशातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. ही बातमी ऐकताच अंकिता लोखंडेही त्याच्या घरी पोहोचली. अंकिता आणि सुशांत बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी ब्रेकअपनंतर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम होते.

अंकिता आणि सुशांतने पव‍ित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. या मालिकेने दोन्ही कलाकारांना प्रसिद्धी दिली आणि प्रत्येक घरात त्यांची ओळख निर्माण झाली. त्याची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री मस्त होती. नच बलिए कपल्समध्ये दोघांनीही एकमेकांसोबत सहभाग घेतला होता.


लॉकडाऊनमध्ये तयार केली ३०० गाणी, लवकरच हिमेशचा नवा प्रोजेक्ट येणार
First Published on: July 14, 2020 5:05 PM
Exit mobile version