Ankita Vicky Wedding: अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘या’ दिवशी करणार विक्की जैनसोबत लग्न

Ankita Vicky Wedding: अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘या’ दिवशी करणार विक्की जैनसोबत लग्न

Ankita Vicky Wedding: अभिनेत्री अंकिता लोखंडे 'या' दिवशी करणार विक्की जैनसोबत लग्न

सध्या बॉलिवूडमध्ये लग्न सराई सुरू आहे. २०२१च्या सुरुवातीलाच अभिनेता वरुण नताशा यांनी लग्न केलं तर नुकतीच राजकुमार राव – पत्रलेखा, श्रद्धा आर्या आणि राहुल यांनी देखील साथ फेरे घेतले. डिसेंबर महिन्यात अभिनेत्री विक्की कौशल आणि कतरिना कैफ देखील लग्न करणार आहे. दरम्यान मालिका विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. विक्की आणि अंकिता गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अंकिता नेहमीच तिच्या सोशल मीडियावरुन दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. त्यांच्या फॅन्सना देखील त्यांची केमिस्ट्री पसंती पडली आहे आणि दोघे लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता होती.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, विक्की जैन आणि अंकिता लोखंडे १४ डिसेंबर लग्न करणार आहेत. मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंकिता आणि विक्कीचा शानदार विवाह सोहळा पार पडणार आहे. १२ डिसेंबरला अंकिताचा मेहंदी कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी दोघांचा साखरपूडा पार पडणार आहे. १४ डिसेंबरला अंकिता आणि विक्कीचा लग्न सोहळा पार पडेल त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन होईल ज्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थिती लावणार आहेत.

अंकिताच्या लग्नासाठी तिच्या आईने स्पेशल थिमी ठेवली आहे. हळदीच्या दिवशी सर्व जण पिवळ्या रंगाचे कपडे घालणार आहेत. तर मेहंदीच्या कार्यक्रमाला सगळे ब्राइट पॉप कपडे घालणार आहेत. अंकिताच्या संगीत कार्यक्रमाला सगळे इंडो वेस्टर्न थीममध्ये दिसणार आहेत.

नुकतीच अंकिताने तिच्या गर्ल गॅग सोबत बॅचलर्स पार्टी इन्जॉय केली. या पार्टीत अभिनेत्री मृणाल ठाकूर,रश्मी देसाई सह अंकिताच्या अनेक मैत्रिणी होत्या. बॅचलर पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ अंकिताने शेअर केले आहेत.


हेही वाचा – प्रतिक्षा संपली! Vicky Kaushal-Katrina Kaif च्या लग्नाची तारीख आली समोर

First Published on: November 29, 2021 11:23 AM
Exit mobile version