अनु मलिकवर इस्त्रायल देशाचं राष्ट्रगीत कॉपी करण्याचा होतोय आरोप

अनु मलिकवर इस्त्रायल देशाचं राष्ट्रगीत कॉपी करण्याचा होतोय आरोप

अनु मलिकवर इस्त्रायल देशाचं राष्ट्रगीत कॉपी करण्याचा होतोय आरोप

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अनु मलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांना ट्रोल व्हावं लागल आहे. अशातच पुन्हा एकदा अनु मलिकवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. कारण नुकतच इस्त्रायलच्या जिमनास्ट डोल्गोपयात (Dolgopayat) याने जिमनास्ट मध्ये गोल्ड मेडल पटकावलं. यानंतर डोल्गोपयात यांच्या विजयानंतर देशाचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं होत. आणि हे गीत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इस्त्रायल देशाच्या राष्ट्र गीताची धुन लोकांनी ऐकताच लोकांना ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन (Mera Mulk Mera Desh)’ या गाण्याची आठवण झाली. आणि यानंतर नेटकऱ्यांनी अनु मलिक यांना चांगलच धारेवर धरलं आहे. एका युजर्सने लिहलं “कॉपी करण्यासाठी तुला इस्त्रायलचं राष्ट्रीय गीतचं मिळालं होतं का?.” अनु मलिक यांच्यावर अनेकांनी धुन चोरी केल्याचा ओरोप लावला आहे.

यापुर्वी देखील अनेकदा अनु मलिक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनु मलिक यांच्यावर मी टू अंतर्गत आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर अनु मलिक यांनी इंडियन आयडॉल ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात होता.


हे हि वाचा – viral video: बॉयफ्रेंड विकी जैनला अंकिताने दिली वाढदिवसानिमित्त खास भेट

First Published on: August 2, 2021 10:22 AM
Exit mobile version