अनुप सोनी झळकणार ‘रात बाकी है’ या मर्डर मिस्ट्रीमध्ये

अनुप सोनी झळकणार ‘रात बाकी है’ या मर्डर मिस्ट्रीमध्ये

क्राइम पेट्रोल फेम अनूप सोनी आता लवकरच एका नव्या कोऱ्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनुप सोनी एका वेगळ्या भूमिकेत सर्वांना पाहायला मिळणार आहे. रात बाकी है असे या चित्रपटाचे नाव आहे. मर्डर मिस्ट्री वर आधारित या चित्रपटाती कथा असणार आहे. अनुप सोनी या चित्रपटात एका चित्रपट लेखकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी zee5 या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा ही या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याची भूमिका पार पाडणारे अनुप सोनी यांच्याभोवती फिरते. अनुप सोनी या चित्रपटात एका अशा चित्रपट लेखकाची भूमिका साकारणार आहे जो एका खुनाच्या आरोपात अडकलेला असतो. तसेच त्याखूनाच्या प्रकणातून स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग यामागील आरोपी कोण असेल हे कोडे संपूर्ण चित्रपटामध्ये प्रेक्षकांना गुंतवूण ठेवते. याचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता.


हे वाचा- अभिनेते, लेखक वीरा साथीदार यांचे निधन

First Published on: April 13, 2021 1:46 PM
Exit mobile version