एसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

एसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी नुकतीच चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेतली. एसएस राजामौली यांनी अनुपम खेर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान, अनुपम खेर यांनी हे फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राजामौलींसोबत त्यांची पत्नी रमा राजामौली देखील दिसत आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत एसएस राजामौली यांच्यालाठी एक स्पेशल मॅसेज देखील लिहिलेला आहे. अनुपम खेर यांनी लिहिलंय की, प्रिय रमा जी आणि राजामौली हैदराबादमध्ये तुमच्या घरामध्ये उत्तम जेवण आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद! मला तुमच्याच घरामध्ये तुमचं पारंपारिक पद्धतीने शॉल देऊन स्वागत करून खूप छान वाटलं. मला तुमची विनम्रता आणि साधेपणा खूप आवडला. मी नशीबवान आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.

अनुपम खेर दिसणार या चित्रपटात
अनुपम खेर येत्या काळात कंगना रनौतच्या ‘इमरजेंसी’ चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहे. या शिवाय अनुपम खेर रवि तेजा यांच्या ‘टायगर नागेश्वर राव’ मध्ये दिसणार आहेत.


हेही वाचा :दयानंतर टप्पू सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’?

First Published on: August 4, 2022 11:48 AM
Exit mobile version