म्हणून अनुपम खेर यांनी सोनालीची घेतली भेट

म्हणून अनुपम खेर यांनी सोनालीची घेतली भेट

प्रातिनिधिक फोटो

कॅन्सरशी लढत असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक विशेष संदेश दिला आहे. अनुपम खेर अॅमस्टरडॅम येथे आपल्या शोच्या शुटिंगसाठी गेले होते. याच दरम्यान त्यांनी सोनालीची भेट घेतली. सोनालीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांनी तिला मानसिक धीर दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत अनुपम खेर यांनी ही माहिती दिली. मागील काही महिन्यांपासून सोनाली न्यू यॉर्क येथे कॅन्सवर उपचार घेत आहे. सोनालीने कॅन्सरची माहिती सोशल मीडियावरुन जाहीर केली. त्यानंतर तिला सर्पोट करत खेर यांनी तिला खऱ्या जीवनातील हिरो म्हणून संबोधले होते. सोनाली एक सकारात्मक व्यक्तिमत्व आहे, ज्या प्रमाणे ती कॅन्सरशी लढते आहे ते स्तुत्य आहे.

काय म्हणाले अनुपम खेर?

“शुटिंग निमित्त मी चार ते पाच महिने न्यू यॉर्क मध्येच आहे. दरम्यान मी नेहेमी सोनालीला भेटतो. नेहेमी सकारात्मक बोलून मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. मी कधी घरी परतेल हे माहित नाही मात्र लवकरात लवकर सोनाली बरी होईल अशी माझी इच्छा आहे. सोनाली एक खंबीर महिला आहे. शारीरिकच नाही तर मानसीक रित्याही ती खूप खंबीर आहे. ज्या प्रकारे ती कॅन्सरशी लढा देत आहे ते स्तुत्य आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की, सोनालीला कॅन्सरशी लढण्याची शक्ती दे. या कठीण वेळी सोनालीचे कुटुंबीय आणि तिच्या जवळील व्यक्तींची तिला साथ मिळाली आहे.”

सोनालीवर उपचार सुरु असताना देखील सोनाली आपल्या इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे. सोनाली सोशल मीडियावर उपचारादरम्यान तिला आलेले अनुभव फोटोच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार तिला भेटण्यासाठी येतात. सोनालीचे फॅन्स आतुरतेने ती बरी होण्याची वाट बघत आहे. सोनालीने नुकताच टाकलेल्या फोटोत ती ‘जेंटलमॅन इन मॉस्को’ पुस्तक वाचत आहे. हे पुस्तक वाचनीय असल्यामुळे मी अजून वाट बघू शकत नाही. असे तिने फोटो खाली कमेंट केली आहे.

First Published on: October 2, 2018 4:01 PM
Exit mobile version