अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन मुख्य भूमिकेत

अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन मुख्य भूमिकेत

अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन दिसणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. अनुरागच्या नव्या सिनेमात अभिनेत्री कृति सेनन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यपने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ‘आणखी एक नवीन स्क्रिप्ट…एक नवीन सिनेमा… निखिल द्विवेदी आणि कृती सेनेन सोबत लकरच सिनेमाला सुरुवात होईल’,  असे म्हणत अनुराग कश्यप यांनी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अनुराग कश्यप सिनेमाची स्क्रिप्ट लिहित आहेत. त्याच्यामागे पुस्तकांचे भले मोठे कपाट दिसत आहे. अनुराग कश्यप यांच्या नव्या सिनेमासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

सिनेमात अभिनेत्री कृति सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे कृतिने मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. या आधी कृति ‘मिमी’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसली होी. सिनेमातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. कृति आता लवकरच अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ तसेच अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमातही प्रमुख भूमिका निभावणार आहे. कृति सेननचे येत्या काळात अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. वरुन धवनच्या ‘भेडिया’, टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ आणि कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ सिनेमातूनही कृति सेनन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यपने त्याच्या आगामी सिनेमाचे नाव अद्याप ठरवलेले नाही. कृति सेनन पहिल्यांदाच कर्मिशिअल सिनेमात दिसणार आहे. निखिल आणि कृति देखील पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांना मजा येणार हे नक्की.


हेही वाचा – Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ बदलणार हिंदुस्थानी चित्रपटांचा चेहरा

First Published on: December 15, 2021 7:16 PM
Exit mobile version