घरताज्या घडामोडीBrahmastra: 'ब्रह्मास्त्र' बदलणार हिंदुस्थानी चित्रपटांचा चेहरा ; मोशन पोस्टर रिलीज

Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ बदलणार हिंदुस्थानी चित्रपटांचा चेहरा ; मोशन पोस्टर रिलीज

Subscribe

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय या चित्रपटात बिग-बी म्हणजेच बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेसुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय या चित्रपटात मौनी रॉय आणि नागार्जुन हेसुद्धा या चित्रपटात आपली भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक अयान मुखर्जीने हिंदी चित्रपटात फक्त दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. असे असूनही, त्यांचे हे दोन चित्रपटच त्यांची खरी ओळख बनली आहे. ते परंपरांना आधुनिकताशी जोडणारे अनेक चित्रपट रीलीज करत असतात. त्यांनी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रीलीज केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

- Advertisement -

ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या झलकमधील शेवटच्या फ्रेममध्ये या चित्रपटाच्या संपूर्ण कथेची हिंट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यामध्ये एका विशालमय प्रतिमेमध्ये रणबीर कपूर दिसत आहे.त्याच्या डाव्या हातात त्रिशुळ आहे तर, त्याचा उजव्या हाताच्या पंजावरील प्रतिमा वेगळी आहे.एकंदरीत रणबीर कपूरने या ब्रह्मास्त्र चित्रपटात शिवाची भूमिका साकारली आहे.त्यांची मूठ बंद असून, या बंद मूठीमध्येच संपूर्ण कथेचे गुपित लपले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर करत,’अखेर जगासमोर ब्रह्मास्त्र शेअर करण्याचा आमचा प्रवास सुरु झाला आहे.लव्ह…लाइट….फायर असे कॅप्शन दिले आहे.याशिवाय ब्रह्मास्त्रचा मोशन पोस्टर रीलीज होण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ब्रह्मास्त्र हा चित्रपट ९ संप्टेंबर २०२२ ला रीलीज होणार आहे.  ब्रह्मास्त्र हा एका पौराणिक कथेवर आधारित असून, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही प्रसिद्ध जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे.


हे ही वाचा – पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांच्या त्रासामुळे पक्षाला रामराम, रुपाली पाटील यांची मनसेच्या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रीया


 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -