Anushka Sharma : अनुष्काचं सिनेसृष्टीत कमबॅक, साइन केले ३ बिग बजेट सिनेमे

Anushka Sharma : अनुष्काचं सिनेसृष्टीत कमबॅक, साइन केले ३ बिग बजेट सिनेमे

Anushka Sharma : अनुष्काचं सिनेसृष्टीत कमबॅक, साइन केले ३ बिग बजेट सिनेमे

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यापासून सिनेसृष्टीपासून थोडी दूर गेली होती. मात्र अनुष्का बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. अनुष्काने मधल्या काळात अनेक जाहिरातींमध्ये काम केले. मात्र तब्बल ३ वर्षांनी अनुष्का मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अनुष्काने ३ बिग बजेट सिनेमे साइन केले आहेत. यातील दोन सिनेमे हे थियेट्रिकल रिलीज होणार आहेत. एक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमातून अनुष्का ओटीटीवर पदार्पण करणार आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा असणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा २०२२मध्ये बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय हे तिच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षातील सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे. २०२२मध्ये अनुष्का तिच्या नव्या प्रोजेक्टच्या कामांना सुरुवात करणार आहे. अनुष्काचे आगामी तिनही सिनेमांमध्ये एंटरटेनमेंटचा धमाका असणार आहे. अनुष्का तिच्या कामासाठी फार पॅशिनेट आहे. आतापर्यंत अनुष्काचे सर्व सिनेमे हीट झाले आहेत. अनुष्काचे अभिनय कौशल्य आणि वर्सटॅलिटी तिने प्रत्येक सिनेमातून दाखवून दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षात येणाऱ्या तिन्ही सिनेमात अनुष्का धम्माल उडवेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

त्याचप्रमाणे अनुष्काचे सिनेमे असोत किंवा जाहिरातील अनुष्काची चॉइस नेहमीच हीट होते. अनुष्काचे कोणतेही काम पाहताना ती नेहमीच काही नवीन आणि फ्रेश प्रेक्षकांना देत असते. अनुष्का सध्या नवीन सिनेमाच्या तयारीसाठी स्वत:ला तयार करत आहे. आपल्या एक्टिंग करिअरकडे अनुष्का प्रचंड फोकस आहे.

प्रेग्नंट असताना अनुष्का बऱ्याच जाहिरातीत दिसली होती. वामिकाचा जन्म झाल्याने अनुष्का वामिका आणि विराट सोबत तिचा क्वॉलिटी टाइम स्पेंड करत होती. मात्र वामिका देखील आता मोठी होत आहे त्यामुळे अनुष्का देखील नव्या जोमाने सिनेसृष्टीत कमबॅक करण्यासाठी तयार आहे.


हेही वाचा – अनन्या पांडे इशान खट्टरसोबत सिक्रेट वेकेशनवर, रोमँटीक फोटो व्हायरल

First Published on: December 31, 2021 4:00 PM
Exit mobile version