घरताज्या घडामोडीअनन्या पांडे इशान खट्टरसोबत सिक्रेट वेकेशनवर, रोमँटीक फोटो व्हायरल

अनन्या पांडे इशान खट्टरसोबत सिक्रेट वेकेशनवर, रोमँटीक फोटो व्हायरल

Subscribe

दोघेही जंगल सफारीचा आनंद घेत आहेत

अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता इशान खट्टर यांच्या अफेअर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.दोघांना अनेक वेळा सिनेमांच्या प्रिमियम, पार्ट्यांना स्पॉट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा पहायला मिळत आहेत. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी सीक्रेट वेकेशनवर गेले आहेत. इशान आणि अनन्या देखील सध्या एका सीक्रेट वेकेशनवर आहेत. सध्या दोघेही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्र सेलिब्रेशन करत आहेत. दोघेही एकाच ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. याचे काही पुरावे देखील समोर आले आहेत. आणि त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आले आहेत.

 

- Advertisement -

२०२१च्या सुरुवातीलाही इशान आणि अनन्या एकत्र सुट्ट्यांसाठी गेले होते. यंदा देखील दोघेही सीक्रेट जागेवर नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. इशान आणि अनन्याने त्याच्या सोशल मीडियावर एकच फोटो शेअर केला आहे. दोघेही जंगल सफारीचा आनंद घेत असल्याचे सांगितले जात आहे. दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चांदण्यांनी भरलेले आभाळ आणि झाडे दिसत आहेत. दोघांची इन्स्टाग्राम स्टोरी पाहून त्यांचे फॅन्स देखील अवाक झालेत. दोघेही एकाच सीक्रेट वेकेशनवर आहेत हे यातून समोर आले आहे.

 

- Advertisement -

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी २०२०मध्ये ‘खाली पीली’ या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. सिनेमाच्या शुटींगदरम्यान दोघे फार जवळ आले होते. सिनेमाच्या रिलीजनंतरही दोघांच्या प्रेमाचा सिलसीला कायम राहिला. अनन्याचे आगामी काळात दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ आणि दीपिका पादुकोण, धीर्या करवा, सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘गहराइया’ या सिनेमातही अनन्या दिसणार आहे. तर ईशान खट्टर हा आगामी काळात पिप्पा आणि फोन भूत या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा –  Box Office वर साउथ सिनेमांचा बोलबाला, करतायत करोडोंची कमाई

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -