रंगकर्मींचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्याची विनंती

रंगकर्मींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र, ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्याची विनंती

खुशखबर! १ डिसेंबरपासून पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू होणार

कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका सिनेसृष्टीला आणि कलाकारांना बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नाट्यगृहे बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी व्यावसायिक पातळीवर नाटके सुरु होती, मात्र त्यानंतर सर्व ठप्प झाले. राज्यात लसीकरण मोहिमेला देखील वेग आलाय. अनेक गोष्टींमध्ये शिथिलता मिळाली आहे. मालिका तसेच सिनेमांचे शुटींग सुरू आहे मग त्यात नाटकांना अपवाद का असावा? असा प्रश्न उपस्थित करत रंगकर्मींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी कळकळीची विनंती नाट्यकर्मींनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.(Artist letter to CM Uddhav Tahckeray request to start theaters with 50% seating capacity)

आता अनेक गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. नाटक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सशर्त का असेना नाटक सुरू होणे आवश्यक आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनेक गोष्टी बंद असल्याने त्याचा आर्थिक गोष्टींवर फार परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे सामाजाचे मानसिक आरोग्य ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण नाटयगृह नाही निदान ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृह सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, असे या पत्रात लिहिले आहे. ई मेल द्वारे पाठवण्यात हे पत्र मुख्यमंत्री महोदय नक्कीच सहृदयतेने विचार करतील अशी खात्री आहे, असे रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांनी म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी अभिनेता भरत जाधव, प्रशांत दामले यासारख्या कलाकारांची नाटके रंगभूमीवर सुरु होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून रंगकर्मी सावरत असताना दुसऱ्या लाटेचा त्यांना जोरदार फटका बसला. रंगकर्मी अतुल पेठे, शंभू पाटील, वामन पंडित, दत्ता पाटील, अभिजीत झुंजारराव, अनिल कोष्टी हे रंगकर्मी राज्याच्या विविध कोपऱ्यात प्रायोगिक रंगभूमीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांची ही विनंती मुख्यमंत्री मान्य करतील अशी आशा आहे.

 


हेही वाचा – काळ्या रंगावरुन केला होता अपमान, सोनाली कुलकर्णीने केला खुलासा

First Published on: July 13, 2021 12:52 PM
Exit mobile version