Viral Photo: KBCची हॉट सीट शेअर करणार Indian Idol 12 फर्स्ट रनर अप!

Viral Photo: KBCची हॉट सीट शेअर करणार Indian Idol 12 फर्स्ट रनर अप!

Viral Photo: KBCची हॉट सीट शेअर करणार Indian Idol 12 फर्स्ट रनर अप!

इंडियन आयडॉल १२ची (Indian Idol 12) फर्स्ट रनर अप अरुणिता कांजीलाल (arunita kanjilal) आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली आहेत. इंडियन आयडॉलनंतर अरुणिताची तगडी फॅन फॉलोअर्स झाले आहेत. नेहमी अरुणिताने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता अरुणिताचा सध्या बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे अरुणिता आता अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (KBC) हॉट सीटवर दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अरुणिताचा सध्या जो फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये अरुणिता आपल्या वडिलांसोबत आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर अरुणिता कांजीलाल लवकरच चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसताना दिसेल, असे म्हटले जात आहे.


हेही वाचा – Saira Banu Hospitalized: जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडल्याने ICU मध्ये उपचार सुरू


First Published on: September 1, 2021 3:18 PM
Exit mobile version