जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग, बादशाह आणि सुलतान असतील…;विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग, बादशाह आणि सुलतान असतील…;विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

मागील काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली, शिवाय या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकले. तेव्हापासून विवेक अग्निहोत्री वारंवार चर्चेत असतात. सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्यांनी बॉलिवूडमधील सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान या मंडळींवर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नुकत्याच दोन दिवसांपूर्वी दिग्दर्शिका लीना मणिमेकलाईवर काली प्रकरणाबाबत टीका केली होती, दरम्यान आता सुद्धा खान मंडळींवर टीका केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीटमध्ये लिहिलं की, “जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग, बादशाह आणि सुलतान असतील. तोपर्यंत हिंदी चित्रपट हिट होऊ शकत नाहीत. जेव्हा तुमच्या गोष्टीवर आधारित या लोकांची इंडस्ट्री चित्रपट बनवेल, तेव्हाच हे ग्लोबल चित्रपटसृष्टीला लीड करू शकतील. हेचं सत्य आहे. विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटची सध्या चर्वत चर्चा होत आहे.”

दरम्यान, कोरोनाच्या दोनवर्षानंतर बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारशी पसंती देत नाहीत. उत्तम सादरीकरण आणि कथा यांमुळे टॉलिवूड चित्रपट नेहमीच बॉलिवूडच्या तुलनेत चांगली कमाई करतात. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी या खान कलाकारांनी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्याकडे पूर्वी ७० आणि ८० च्या दशकात ज्या पद्धतीचे चित्रपट तयार व्हायचे आता तसे चित्रपट पाहायला मिळत नाही असं ही खान कलाकार म्हणाले होते. त्याचा टोला म्हणून विवेक अग्निहोत्रींनी हे ट्वीट शेअर केले आहे. दरम्यान आता या ट्वीटची चर्चा ही जोरदार चालू आहे.


हेही वाचा :एनसीबीच्या रिपोर्टनंतर सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

First Published on: July 14, 2022 3:16 PM
Exit mobile version