एनसीबीच्या रिपोर्टनंतर सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. ड्रग्ज देण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रामध्ये एनसीबीच्या रिपोर्टमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर आता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांच्या मते, त्यांना रियावर आधीपासून संशय होता. तसेच त्यावेळी ते हे देखील म्हणाले की, आता महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाला आहे त्यामुळे आता खऱ्या शिवसेनेच्या सरकारमध्ये खरं समोर येऊ लागलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारचे मंत्री नीरज कुमार बबलू यांनी रिया चक्रवर्तीबाबत सांगितलं की, ते आधीपासूनच तिच्यावर ड्रग्ज देत असल्याचा आरोप करत होते. आता महाराष्ट्रामध्ये खऱ्या शिवसेनेचं सरकार हे सांगत आहे तर चांगली गोष्ट आहे. तसेच आता आम्ही सुद्धा सुशांतच्या खऱ्या गुन्हेगारांना कधी शिक्षा होते याचीच आम्ही वाट पाहतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

एनसीबीच्या रिपोर्टमध्ये काय सिद्ध झालं?
महाराष्ट्रातील एनसीबीच्या रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज दिले होते असा आरोप केला आहे. एनसीबीने आपल्या रिपोर्टमध्ये आरोप लावला आहे की, रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोविक आपल्या मित्रांकडून गांजा मागवून सुशांतला द्यायचे.

 


हेही वाचा :सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB कडून रियावर ठपका