अथिया-केएल राहुलच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अथिया-केएल राहुलच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल सोमवारी (23 जानेवारी) विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे मोजके पाहुणे हजर होते.फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. लग्न झाल्यापासून या जोडप्याच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावनर व्हायरल होत होते. दरम्यान, लग्नाच्या फोटोंनंतर आथिया आणि केएल राहूलच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.

आथियाने शेअर केले हळदीचे फोटो

अशी सुरु झाली अथिया-केएल राहुलची लव्हस्टोरी

अथिया-राहुल गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.

 


हेही वाचा :

‘पठाण’ चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये कोल्डड्रिंकवरून हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

First Published on: January 28, 2023 10:33 AM
Exit mobile version