‘मेरी कॉम’ मध्ये प्रियांकाच्या जागी मणि‍पुरी ॲक्टर का निवडली नाही?

‘मेरी कॉम’ मध्ये प्रियांकाच्या जागी मणि‍पुरी ॲक्टर का निवडली नाही?

'मेरी कॉम'मध्ये प्रियांकाच्या जागी मणि‍पुरी ॲक्टर का निवडली नाही?

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडमध्ये देखिल मजल मारली. साल 2014 साली आलेला सिनेमा मेरी कॉम मध्ये प्रियांकाने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन मेडलिस्ट मेरी कॉमच्या भुमिकेत झळकली होती. पण याच भुमिकेसाठी आता प्रियांकाला कास्ट केल्याबद्ल अभिनेत्री,मॉडल लिन लॅशरामने प्रियांकावर टिका केली आहे. सिनेमात लिनले प्रियांकाच्या मैत्रिनीची भुमिका साकारली होती.मुळातच मणिपुरमध्ये राहणारी अभिनेत्री लिन लॅशरामने खुलासा केला आहे .” 2014 मध्ये मेरी कोम सिनेमामध्ये कास्टिंग करताना भेदभाव केला गेला. प्रियांकाने या रोल साठी प्रचंड मेहनत केली होती याबद्दल दुमत नाहिये पण एखाद्या नॉर्थ-ईस्ट मणिपुरी अभिनेत्रीची देखिल लीड रोलसाठी निवड करु शकले असते जी आमचे प्रतिनिधीत्व करु शकेल. प्रियांकाने मेरी कॉमच्या लुक साठी तासं- तास मेकरुम मध्ये तायार होत असे. सिनेमात एखाद्या व्यक्तीला कास्ट करणे हे खुप आव्हानात्मक असते.कास्टिंग टिमने प्रामाणिकपणे एखाद्या मणिपुरी अभिनेत्रीची निवड करायला हवी होती.

जेव्हा नॉर्थ मधिल अचिव्हरच्या रोल निभावण्याची वेळ येते तेव्हा कोणत्याही गैर नॉर्थ इस्ट व्यक्तील निवडले जाते. जसे कि मेरी कॉम मध्ये झाले आहे. तसेच कोणत्याही नॉर्थ ईस्ट लोकांना भारतीय सिनेमात क्वचीतच स्थान दिले जाते. तसेच लिनने फॅमिली मॅन वेब सिरीजच्या कास्टिंग बद्दल देखिल तिचे मत मांडले जर लेटेस्ट उदाहरण द्यायचे झाल्यास द फॅमिली मॅन 2 मध्ये तमिलनाडु आणि तमिल भाषा बोलनाऱ्या लोकांना कास्ट करण्यात आले. कारण लोकल कल्चरला रिप्रेजेंट करता यावे यामुळे लोकांचा खुप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि कलाकारांचे कौतुक करण्यात आले. जर साउथ इंडियन संकृती स्वीकार्य आहे तर नॉर्थ ईस्टर्न का नाही,” अश्या परखड शब्दत लिनने आपले मत मांडत तिची व्यथा प्रकट केली.


हे हि वाचा – HBD : नक्षलवाद्याचा झाला हिरो, एक टेकमध्ये सीन शूट करायचे मिथुन चक्रवर्ती

First Published on: June 16, 2021 12:41 PM
Exit mobile version