घरमनोरंजनHBD : नक्षलवाद्याचा झाला हिरो, एक टेकमध्ये सीन शूट करायचे मिथुन चक्रवर्ती

HBD : नक्षलवाद्याचा झाला हिरो, एक टेकमध्ये सीन शूट करायचे मिथुन चक्रवर्ती

Subscribe

एक संपुर्ण काळ गाजवणारे मिथून दा आजही त्यांच्या डिस्को डांसर या विषेश नावाने ओळखले जातात

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती काही आश्या निवडक अभिनेत्यांनपैकी आहेत ज्यांनी पहिल्या चित्रपटावेळीसच सर्वोतकृष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होत. आज 16 जून रोजी मिथुन चक्रवर्ती त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमीत्त त्यांच्या आयुष्यातील काही निवडक महत्वपुर्ण घटना जाणून घेऊया. मिथुन चक्रवर्ती यांचे खरं नाव गौरांग चक्रवर्ती आहे. त्यांचा जन्म 1950 साली बांग्लादेश मधिल बारिसाल या ठिकाणी झाला होता नंतर त्यांचे कुटूंब भारतात स्थायिक झाले. मिथुन यांना प्रेमाने लोकं ‘मिथुन दा’ अशी हाक मारत असे. त्यांनी सुरूवातीला कोलकातामध्ये त्यांनी शिक्षण पुर्ण केले. तसेच त्यांना लहानपणा पासुनच अभिनयात रुची होती. आणि याच कारणांमुळे त्यांनी शिक्षण पुर्ण झाल्या नंतर अभिनयात करियर पुर्ण करण्यासाठी पुणे फिल्म अँड टेलीविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये ॲडमिशन घेतले. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली बॉलिवूडमध्ये फिल्म ‘मृगया’ मधून डेब्यू केलं होतं. आणि याच सिनेमासाठी त्यांना बेस्ट ॲक्टर नॅशनल अवॉर्ड  मिळाला होता.

- Advertisement -

मिथुन यांनी ॲक्टिंग, ॲक्शन डांसिंग या तीनही कलेत तरबेज झाले होते.त्यांनी वेगवेगळ्या भाषेत बंगाली, हिंदी, ओड़िया, भोजपुरी, तमिल, तेलुगू, कन्नड, पंजाबी मध्ये 350 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मिथून यांनी बॉलिवूड डेब्यू फिल्म ‘दो अंजाने’ मध्ये त्यांनी लहान भुमिका देखिल उत्तमरित्या सादर केली. तेरे प्यार में, प्रेम विवाह, हम पांच, डिस्को डांसर, हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथ, तितली, गोलमाल 3, खिलाड़ी 786, द ताशकंद फाइल्स मध्ये काम केलं। अभिनया व्यतीरिक्त खुप कमी लोकांना हे ठाऊक आहे की मिथून दा यांनी मार्शल आर्ट मध्ये एक्सपर्ट ट्रेनिंग घेतली आहे आणि ते ब्लॅक बेल्ट आहेत. माहितीनुसार मिथुन पहिले नक्सली होते पण एका दुर्घटनेमुध्ये त्यांच्या भावाचे निधन झाले यामुळे त्यांना पुन्हा परिवाराकडे यावे लागले संपुर्ण कुटूंबाला सांभाळण्याची जबाबदारी मिथून दा वर आलि होती. एके काळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘चक्रवर्ती शॉट’ चालत असे, कारण मिथुन दा पहल्याच टेक मध्ये सीन पुर्ण करत होते. या गोष्टीचा खुलासा साल 2017 मध्ये डांस इंडिया डांस मालिकेच्य सीजन 6 च्या मंचावर झाला होत 80च्या दशकात फक्त मिथुन दा यांनाच जलवा होता. चाहत्यांनमध्ये त्यांच्या डांसची,स्टईलची प्रचंड क्रेज होती. त्यावेळेस बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन यांनी नुकतच प्रदार्पण केलं होतं. ‘मेरा रक्षक’, ‘सुरक्षा’, ‘तराना’, ‘हम पांच’, ‘डिस्को डांसर’, ‘प्यार झुकता नहीं’ मिथून दा यांचे यासारखे सिनेमा खुप गाजले। पण त्यांना खरी ओळख डिस्को डांसर या सिनेमातून मिळाली. आणि संपुर्ण देशाला डांसिंग स्टार भेटला.चाहत्यांच्या प्रमाच्या वर्षावाने मिथुन दा यांनी खुप प्रसिद्धी मिळवली. सध्या मिथुन दा मोठ्या पडद्यापासून दूर राहणे पसंत करतात. एक संपुर्ण काळ गाजवणारे मिथून दा आजही त्यांच्या डिस्को डांसर या विषेश नावाने ओळखले जातात


हे हि वाचा – कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? बॉम्बे हायकोर्ट 25 जूनला घेणार निर्णय

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -