अयान मुखर्जीने सांगितली ‘ब्रह्मास्त्र’मधील वेगवेगळ्या शस्त्रांचे महत्त्व

अयान मुखर्जीने सांगितली ‘ब्रह्मास्त्र’मधील वेगवेगळ्या शस्त्रांचे महत्त्व

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र चित्रपटाची पडद्यामागची कहाणी सांगत आहे. अयान मुखर्जीने यात ब्रह्मास्त्राची उत्पत्ती कशी झाली आणि त्यात किती प्रकारची शस्त्रे आहेत. याची सविस्तर माहिती दिली आहे.

अयान मुखर्जीने नेमक काय म्हटले?

ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या आगामी ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा या चित्रपटाची संकल्पना स्पष्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये अयान मुखर्जी ब्रह्मास्त्रमधील शस्त्रांचा इतिहास, विविध अस्त्र आणि ब्रह्मास्त्राचे महत्त्व याविषयी माहिती सांगताना दिसतोय.

दरम्यान अयानने अग्निस्त्र, पवनास्त्र, नंदीस्त्र, जलस्त्र, वायुस्त्र आणि सर्वात शक्तिशाली ब्रह्मास्त्र यांसारख्या शक्तिशाली शस्त्रांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यानंतर आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढतेय.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जी याला ओळखले जाते. ब्रह्मास्त्र हा त्याचा आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमधील सर्वात मोठा चित्रपट आहे, हा सिनेमा बनवण्यासाठी त्याला 9 वर्षे लागली. 300 कोटींच्या मेगा बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


मन उडू उडू झालं मालिकेचा शेवटचा सीन शूट, मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप


First Published on: July 13, 2022 6:40 PM
Exit mobile version