Chandigarh Kare Aashiqui trailer: आयुष्मान-वाणीच्या Sizzling केमिस्ट्रीने चाहत्यांची जिंकली मनं

Chandigarh Kare Aashiqui trailer: आयुष्मान-वाणीच्या Sizzling केमिस्ट्रीने चाहत्यांची जिंकली मनं

Chandigarh Kare Aashiqui trailer: आयुष्मान-वाणीच्या Sizzling केमिस्ट्रीने चाहत्यांची जिंकली मनं

अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंदीगढ करे आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आयुष्मान खुराना पहिल्यांदाच इतर चित्रपटातील भूमिकेपेक्षा वेगळ्या रुपात चंडीगढ मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान जीम ट्रेनर दाखवला आहे. तर अभिनेत्री वाणी कपूर यामध्ये झुंबा ट्रेनर म्हणून दाखवली आहे.

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपटात आयुष्मान आणि वाणीची जबरदस्त केमिस्ट्री पाहून प्रेक्षक घायाळ झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करत आयुष्मानने लिहिले आहे की, ‘वेट ट्रेनिंग पूर्ण केली, स्कॉट्स मारले, आशिकी माहिती नाही, माझी चेकलिस्ट तयार आहे. पण तुम्ही तयार आहात. १० डिसेंबरला चित्रपटगृहात भेटूयात.’

लव्ह, बोल्डनेस आणि ड्रामाने भरलेला या चित्रपटाचा ट्रेलर मनोरंजनाचा डबल डोस देणारा आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटनिमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर वाणी आणि आयुष्मानच्या केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, या चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानने खूप मेहनत घेतली आहे. शूटिंग दरम्यान तासांतास आयुष्मान जिममध्ये घालवत असे.


हेही वाचा – अक्षय कुमार, अजय देवगणनंतर विक्की कौशल ‘INTO THE WILD’मध्ये दिसणार


First Published on: November 8, 2021 4:10 PM
Exit mobile version