घरताज्या घडामोडीअक्षय कुमार, अजय देवगणनंतर विक्की कौशल ‘INTO THE WILD’मध्ये दिसणार

अक्षय कुमार, अजय देवगणनंतर विक्की कौशल ‘INTO THE WILD’मध्ये दिसणार

Subscribe

सध्या बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) वैयक्तिक जीवनाबद्दल खूपच चर्चेत आहे. विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कॅफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ (Uri the surgical strike) चित्रपटानंतर ‘सरदार उधम’मधून (Sardar Udham) विक्की कौशलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ पाडली आहे. यामुळेही विक्की चर्चेत आहे. लवकरच विक्की ‘इनटू द वाईल्ड’च्या (Into The Wild) येणाऱ्या भागात बेअर ग्रिल्ससोबत (Bear Grylls) दिसणार आहे.

विक्कीने इन्स्टाग्रामवर ‘इनटू द वाईल्ड’च्या नव्या एपिसोडचा पोस्टर जारी केला आहे. यामध्ये विक्की बेअर ग्रिल्ससोबत शोमध्ये दिसण्यासाठी तयारी असल्याचे दिसत आहे. विक्की कौशलने हा पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आयुष्यभरातील एक साहसी काम ज्यामध्ये कोणी दुसरा नाही तर बेअर ग्रिल्ससोबत शोचा भाग होण्याची संधी मिळाली.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे विक्की अक्षय कुमारे, अजय देवगण, रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे. हे सर्वजण विक्कीच्या पूर्वी या लोकप्रिय शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत सामील झाले होते. विक्की कौशलचा हा एपिसोड यावर्षी १२ नोव्हेंबरमध्ये प्रसारित होईल.

विक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या विक्कीच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यानंतर विक्की कौशल ‘अश्वथामा’ आणि ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर विकी कौशल-कतरिनाचा रोका सोहळा संपन्न, फोटो व्हायरल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -