तानाजीचा दिग्दर्शक आता बाहुबली सोबत, प्रभासच्या नव्या चित्रपटाची घोषणा

तानाजीचा दिग्दर्शक आता बाहुबली सोबत, प्रभासच्या नव्या चित्रपटाची घोषणा

अभिनेता प्रभास

अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी त्याने एक खूषखबर दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेता दीपिका पदुकोण बरोबर चित्रपट करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता आणखी प्रभासचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिपुरूष असं या चित्रपटाच नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. प्रभासने इंस्टावर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.

या आधी दिग्दर्शक ओम राऊत यांनी अजय देवगनच्या तानाजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. प्रभासने इंस्टावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट थ्रीडी अ‍ॅक्शन ड्रामा असेल. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले आहे, वाईट गोष्टीसोडून चांगल्या गोष्टींच सेलेब्रेशन करूयात. या चित्रपटात प्रभास आदिपुरूषाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप चित्रपटात प्रभासचा लूक अद्याप रिव्हिल करण्यात आलेला नाहीये. मंगळवारी सकाळी ७.११ वाजता प्रभासने इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला आणि आपल्या नवीन चित्रपटाचे संकेत दिले.

प्रभासचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. दीपिका पदुकोणसोबत एक चित्रपटही तो करणार आहे. नाग अश्विन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. प्रभास आणि दीपिका पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

First Published on: August 18, 2020 9:24 AM
Exit mobile version