The Empire वेबसीरिजवर बंदीची राम कदमांची मागणी; तर ट्वीटरवर Uninstall Hotstar ट्रेडिंग

The Empire वेबसीरिजवर बंदीची राम कदमांची मागणी; तर ट्वीटरवर Uninstall Hotstar ट्रेडिंग

The Empire वेबसीरिजवर बंदीची राम कदमांची मागणी; तर ट्वीटरवर Uninstall Hotstar ट्रेडिंग

सध्या डिज्नी हॉटस्टारवरील (Disney+ Hotstar) ‘द एम्पायर’ (The Empire) वेबसीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हा वाद इतका वाढला आहे की, आता लोक हॉटस्टारवर बहिष्कार घातला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर Uninstall Hotstar हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आता भाजप आमदार राम कदम (BJP mla ram kadam) यांनी देखील द एम्पायर वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ‘बजरंगी भाईजान’, ‘काबुल एक्सप्रेस’ आणि ‘ एक था टायगर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या कबीर खानने (Kabir khan) मुघल हेच खरे राष्ट्रनिर्माता असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. हे विधान मागे घेण्याची मागणी देखील भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

राम कदम म्हणाले की, ‘हॉटस्टारवर ‘द एम्पायर’ नावाची वेबसीरिज येत आहे. या वेबसीरिजमध्ये ज्या आक्रमणकारी मुघलांनी आपल्या भारतावर आक्रमण करुन रक्तपात करत लुटमार केली. लोकांवर अत्याचार केलेत. त्यांची स्तुती केली जात आहे. अशाच प्रकारे स्तुरी करणारे विधान चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने केली होती. ज्या मुघलांनी भारताला लुटलं. त्या मुघलांची स्तुती कशी होऊ शकते? या वेबीसीरिजचा मी विरोध करतो आणि त्यावर पूर्णपणे बंदी घालावी. तसेच जे विधान चित्रपट दिग्दर्शकाकडून करण्यात आले आहेत, ते त्यांनी मागे घ्यावे.’

डिज्नी हॉटस्टारवरील ‘द एम्पायर’ वेबसीरिजचे आज सर्व एपिसोड प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये कुणाल कपूरसह डिनो मोरिया आणि शबाना आजमी आहेत. ही वेबसीरिज मुघल राजा बाबरवर आधारित आहे. निखिल अडवाणी यांच्या ‘एम्पायर ऑफ द मुघल – रायडर्स फ्रॉम द नॉर्थ’ या कांदबरीवर ही वेबसीरीज आधारित आहे. याच लेखक एलेक्स रदरफोर्ड आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ‘द एम्पायर’ वेबसीरिज वादाच्या भोवाऱ्यात अडकली असून बंदीची मागणी केली जात आहे.


हेही वाचा – शिबानीने बॉयफ्रेंड फरहान अख्तरसाठी मानेवर काढलं स्पेशल टॅटू


First Published on: August 27, 2021 1:16 PM
Exit mobile version