‘जर्सी’च्या रिलीजपूर्वी शाहिद कपूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत वाचून व्हाल हैराण

‘जर्सी’च्या रिलीजपूर्वी शाहिद कपूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत वाचून व्हाल हैराण

'जर्सी'च्या रिलीजपूर्वी शाहिद कपूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत वाचून व्हाल हैराण

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपले पर्सनल लाईफ खूप लग्झरी पद्धतीने जगतो. त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. परंतु आता शाहिदच्या गॅरेजमध्ये आणखीन एका फँसी कारचे आगमन झाले आहे. याची माहिती शाहिदने स्वतः आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शाहिदची ही रॉयल कार पाहून चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान शाहिदचा ‘जर्सी’ चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ज्याच्या प्रमोशनसाठी शाहिद दिवस-रात्र व्यस्त आहेत.

व्हिडिओ शेअर करून कार दाखवली पहिली झलक

शाहिद कपूर नेहमी आपल्या लाईफसंबंधित असलेल्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे त्याने नुकतीच खरेदी केलेली मर्सिडीज मेबॅच S580 कारची पहिली झलक चाहत्यासाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. शाहिदने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. शाहिदने या कारसोबतचे रील मुंबईतील जुहूमधील जेडब्यू मॅरियेट हॉटलच्या गेटमध्ये केले आहे.


हेही वाचा – अंकिता लोखंडेने दिली गुडन्यूज, कंगनाच्या Lock Upमध्ये केला खुलासा


First Published on: April 3, 2022 4:16 PM
Exit mobile version