घरताज्या घडामोडीअंकिता लोखंडेने दिली गुडन्यूज, कंगनाच्या Lock Upमध्ये केला खुलासा

अंकिता लोखंडेने दिली गुडन्यूज, कंगनाच्या Lock Upमध्ये केला खुलासा

Subscribe

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या हॅपी मॅरिड लाईफचा फेज एन्जॉय करत आहे. याशिवाय अंकिता लोखंडे पत्नी विक्की जैनसोबत टीव्ही शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये काम करत आहे. अलीकडेच अंकिता कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये उपस्थित झाली होती. अंकिता आणि कंगनाचे एक वेगळेच बॉन्डिंग आहे. ‘मर्णिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केले होते. दरम्यान पवित्र रिश्ताच्या आगामी सीझन प्रमोट करण्यासाठी अंकिता लॉकअपमध्ये दिसली. यादरम्यान अंकिताने स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

कंगनाच्या लॉकअप या शोमध्ये येणारा प्रत्येक सदस्य आपले एक सीक्रेट सांगतो. अशाच प्रकारे कंगनाने अंकिताला एक सीक्रेट सांगण्यास सांगितले. कंगना म्हणाली की, ‘अंकिता आमच्याकडे परंपरा अशी की, लोकांना आपल्या आयुष्यातील एक सीक्रेट सांगावे लागते.’

- Advertisement -

कंगनाच्या या प्रश्नावर अंकिताने म्हटले की, ‘तिच्या जवळ कोणतेही सीक्रेट नाही. ‘परंतु पुन्हा जेव्हा कंगनाने पुन्हा विचारले, तर अंकिताने सांगितले की, ‘विक्कीला पण माहिती नाही. मी गर्भवती आहे. माझे अभिनंदन करा.’ हे ऐकून लॉकअपमधले सदस्य आणि कंगना आश्चर्यचकीत झाले. परंतु अंकिताने नंतर सांगितले की, ‘एप्रिल फूल बनवले.’ यावर कंगना म्हणाली की, ‘आज १ एप्रिल नाहीये.’

पुढे कंगना म्हणाले की, ‘हे तुझे खोटे लवकरच सत्यात उतरले, अशी माझी आशा आहे.’ यावर अंकिता म्हणाले की, ‘लवकरच होईल.’ दरम्यान अंकिता १४ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या लॉग्नटाईम बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्नबंधनात अडकली. दोघे सध्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये दिसत आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – रणबीर-आलिया आर के हाऊसमध्ये अडकणार लग्नबंधनात; करणार याचं महिन्यात लग्न


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -