कॅमेरा हाती घेत लेकिने सांभाळली वडिलांची जागा, ‘होम मिनिस्टर’ची टीम भावूक

कॅमेरा हाती घेत लेकिने सांभाळली वडिलांची जागा, ‘होम मिनिस्टर’ची टीम भावूक

कॅमेरा हाती घेत लेकिने सांभाळली वडिलांची जागा, 'होम मिनिस्टर'ची टीम भावूक

‘दार उघड वाहिनी दार उघड’ म्हणत २००४ साली सुरु झालेला होम मिनिस्टरचा (home minister)प्रवास गेली १७ वर्ष अविरत सुरु आहे. ‘गोकुळाष्टमी विशेष भाग सुरु असताना कॅमेरामनची धुरा सांभाळण्यासाठी एक मुलगी आली आणि संपूर्ण होम मिनिस्टरची टीम भावूक झाली. कारण ह्याच प्रवासात अगदी सुरवातीपासून साथ देणारे कॅमेरामन शशी गायकवाड (camaraman shashi gaikwad)यांची ती मुलगी भाग्यश्री शशी.(Bhagashree gaikawad) शशी गायकवाड डिसेंबर २०१७ ला ‘होम मिनिस्टर’च्या आपल्या कुटुंबाला सोडून कायमचे निघून गेले.(bhagyashree shashi as a camaraman on the set of home minister)

या आठवणींना उजाळा देत आदेश बांदेकर(adesh bandekar) म्हणाले की, “शशी आमच्यात नाही हा आमच्यासाठी एक धक्काच होता, शूटिंग सुरु झालं की शशी समोर दिसायचा. आपल्या घाटकोपरच्या छोट्याश्या घरात कुटुंबासमवेत राहत असताना त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. परिस्थिती बेताची असताना देखील ते आपल्या कुटुंबासमवेत खुश असायचे. त्यांच्या मागे त्यांची मुलगी भाग्यश्री हीने देखील ह्याच क्षेत्रात यायचं ठरवलं आणि कॅमेरा मागे काम करताना तिने एक शॉर्ट फिल्म पण शूट केली. आज तिला होम मिनिस्टर चा कॅमेरा हाताळताना पाहून खूप भरून येतंय आणि आनंदही होतोय.”

 

बाबांच्या आठवणींना उजाळा देत भाग्यश्री शशी म्हणाली, “माझे बाबा ‘होम मिनिस्टर’मध्ये कॅमेरामन आहेत कट टू मी ‘होम मिनिस्टरमध्ये कॅमेरामन आहे.. हा प्रवास माझ्यासाठी फार वेगळा होता. “वडील काम करत होते म्हणून तुलाही काम मिळालं असेल..” असं आजूबाजूचे बरेच लोक बोलताना दिसू लागले आहेत. घरातला एकमेव फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा. ‘झी’ बाबतीत बाबा किती लॉयल होते हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. हा वारसा आपण पुढे चालवायचा हे खूप आधीच ठरवून ठेवलेलं. या कामाच्या बाबतीत तसं फक्त ऐकून होते. बाबा होम मिनिस्टरसाठी काम करत होते तेव्हा ते घरी आल्यावर वेगवेगळे बरेच किस्से ऐकवायचे. त्यांचं आम्ही जसं एक कुटुंब होतं, तसंच अजून एक जवळचं कुटुंब म्हणजे होम मिनिस्टर. बाबा गेल्यानंतर पुन्हा या कुटुंबासोबत हसत खेळत राहू की नाही हा प्रश्न पडायचा. या कुटुंबाने मला पुन्हा त्यांच्यात सामावून घेतले, आणि अखेर मी इथे कॅमेरामन म्हणून मी रुजू झाले.. या संधीबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे.”


हे हि वाचा – साऊथची स्टार रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज, ‘मिशन मजनू’चे शूटींग झाले पूर्ण !

First Published on: August 30, 2021 11:03 AM
Exit mobile version