घरमनोरंजनसाऊथची स्टार रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज, 'मिशन मजनू'चे शूटींग झाले...

साऊथची स्टार रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज, ‘मिशन मजनू’चे शूटींग झाले पूर्ण !

Subscribe

सिनेमात सिद्धार्थ आणि रश्मिकाची केमिस्ट्री अगदी छान जुळून आली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण करणार आहे. ‘मिशन मजनू'(mission majnu) या बहुचर्चित सिनेमात रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharath mhalotra)सोबत झळकणार आहे. रश्मिका आणि सिद्धार्थने (rashmika and siddharath) सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं असून लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (rashmika mandanna debut in bollywood mission majanu ) सिनेमाबाबत सांगायचे झाल्यास ‘मिशन मजनू’ हेरगिरी वरील 1970 सालच्या सत्य घटनेवर आधारीत आहे. तसेच एक थ्रिरल सिनेमा असणार आहे. अभिनेता सिद्धार्थ सिनेमात रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. तर फिल्ममेकर शांतनु बागची यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचे निर्माता अमर बुटाला यांनी अभिनेत्री रश्मिका मंदानाची खूपच प्रशंसा केली आहे.
अमर म्हणाले, “रश्मिकाने मिशन मजून या सिनेमात अतुलनिय कामगिरी केली आहे, आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर रश्मिकाने सिनेमात चार चाँद लावले आहेत. तसेच रश्मिकाचे चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या सकारात्मक प्रभावाने मला देखील काम करण्याची नवी उर्जा जागृत झाली. या सिनेमात सिद्धार्थ आणि रश्मिकाची केमिस्ट्री अगदी छान जुळून आली आहे.”

- Advertisement -

रश्मिका मंदानाने यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमात आपल्या अभिनयाच्या जादूने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. ‘किरिक पार्टी’, ‘अंजनी पुत्र’, ‘गीता गोविंदम’, ‘डियर कॉमरेड’ सारख्या हिट सिनेमात रश्मिका झळकली होती. तसेच रश्मिका फहद फासिल, अल्लू अर्जुन तेलुगु-स्टारर ‘पुष्पा’ मध्ये काम करताना दिसणार आहे.


हे हि वाचा – Khatron Ke Khiladi Season 11 : ‘खतरो के खिलाडी’मध्ये आस्था, सौरभसह विशालची पुन्हा वाइल्ड कार्ड एन्ट्री

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -