भारती सिंहचा मुलगा झाला कृष्णा; व्हिडीओ व्हायरल

भारती सिंहचा मुलगा झाला कृष्णा; व्हिडीओ व्हायरल

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध कॉमेडी क्वीन आणि निवेदिका भारती सिंह वारंवार अनेक कारणांमुळे चर्चेत असते. परंतु भारती जेव्हापासून आई झाली आहे. तेव्हापासून ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. ती वारंवार तिच्या मुलाचे अनेक नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, भारतीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा मुलगा गोला आणि पती हर्षसोबत खेळताना दिसत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या मुलाला कृष्णासारखं सजवलं आहे.

भारतीच्या मुलाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

 

एप्रिलमध्ये भारती झाली होती आई
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला मुलगा लक्ष्यचा 3 एप्रिल 2022 रोजी झाला होता. भारती सिंह वारंवार तिच्या मुलाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या भारती सिंह हुनरबाज या रियालिटी शोमध्ये निवेदन करत आहे.


हेही वाचा :‘बाईपण भारी देवा!’ केदार शिंदेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

First Published on: August 19, 2022 11:02 AM
Exit mobile version