घरताज्या घडामोडी‘बाईपण भारी देवा!’ केदार शिंदेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

‘बाईपण भारी देवा!’ केदार शिंदेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

धम्माल नाटकांतून प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्या आमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एक नवीन सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. 

श्वास, अगं बाई अरेच्च, जत्रा,यंदा कर्तव्य सारखे सुपरहिट सिनेमा तसेच सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, लोच्या झाला रे, आमच्या सारखे आम्हीच, ढॅण्टॅढॅण सारखी धम्माल नाटकांतून प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्या आमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एक नवीन सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.  जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आलेय. सिनेमात सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत, पण त्याची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर आज जिओ स्टुडिओज् ने हा दुसरा पण अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. तसंच एमव्हीबी मीडिया यांची निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट असून माधुरी भोसले
यांनी याची निर्मिती केली आहे. आणि त्यांना बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे.

- Advertisement -

“बाईपण भारी देवा” घेऊन येतोय तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट! लवकरच! असे म्हणत केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

- Advertisement -

चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ‘या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे. आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तुत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे’


हेही वाचा – ‘ही तीच ना… बाई, बुब्स वाली बाई’ , महिला दिनी हेमांगीची पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -