भीमराव एक गौरवगाथा

भीमराव एक गौरवगाथा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव गौरवाने घेतले जाते. भारतात अनके राष्ट्रीय नेते होऊन गेले, परंतु ज्यांच्या त्यागपूर्ण कारकीर्दीवर अनेक गाणी लिहिली गेली. त्यांची जयंती, महानिर्वाण दिनी त्यांना आदरांजली वाहण्यात सामान्य माणसाने पुढाकार घेतलेला आहे. मुंबईत चैत्यभूमीवर उसळणारी भीमसैनिकांची गर्दी त्याची साक्ष देते. जब्बार पटेल यांनी त्यांचा समग्र अभ्यास करून हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता भीमरावांची गौरवगाथा छोटा पडदा पाहणार्‍या प्रेक्षकांनाही पाहता येईल.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, न्यायालयीन, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान होते. प्रभावी कर्तृत्त्वामुळे जनमाणसात संघटनात्मक काम करण्याची त्यांच्याकडे ऊर्जा होती. महामानवाचे हे महान कार्य मालिकेच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे यासाठी स्टार प्रवाह या वाहिनीने पुढाकार घेतलेला आहे. १४ एप्रिल ही डॉ. आंबेडकरांची जयंती लक्षात घेऊन ‘भीमराव एक गौरवगाथा’ ही मालिका सुरू करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकरांची भूमिका कोण करणार, त्यांच्या निमित्ताने येणार्‍या व्यक्तीरेखा कोण असतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवलेले आहे. नीतीन वैद्य हे या मालिकेची निर्मिती करीत आहेत.

First Published on: February 18, 2019 5:04 AM
Exit mobile version