CoronaVirus: भन्नाट भोजपुरी रॅप साँग सोशल मीडियावर तुफान व्हायरल

CoronaVirus: भन्नाट भोजपुरी रॅप साँग सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कोरोना व्हायरसचे संकट देशावर ओढवले असताना, जग नकारात्मकतेने ग्रस्त आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये निराशा दिसून येत आहे. असे असताना समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच या संकंटात न डगमगता आपले कर्तव्य बजावणाऱ्या योद्ध्यांना सलाम करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड क्षेत्रातील सलमान खान सारखे मोठे कलाकार असोत किंवा लहान कलाकार, लॉकडाऊनदरम्यान मनोरंजन व संगीताच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचे काम करत आहेत.

गेल्या काही दिवसांत कोरोना व्हायरसवरील गाणी बर्‍याच भाषांमध्ये बनविली गेली आणि ती व्हायरलही झाली. भोजपुरी भाषेतही कोरोनाशी संबंधित बरीच गाणी तयार करण्यात आली. कोरोनावर तयार केलेलं भोजपुरी रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरस होत असून या गाण्याच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज देखील ऐकू येतो, ज्यामध्ये ते कोरोना व्हायरसबद्दल संदेश देताना दिसतात.

या व्हायरल होणाऱ्या भोजपुरी रॅप साँगला काही तरूणांनी तयार केले आहे. भोजपुरी रॅप साँगचा प्रकार खूपच कमी असल्याने हे गाणं ऐकताना तुम्हाला थोडेसे समजणे कठीणच जाईल.


Video: सलमान खान म्हणतोय प्यार ‘करो-ना’; टीजर रिलीज

 

First Published on: April 22, 2020 1:22 PM
Exit mobile version