‘बिग बॉस’च्या घरात कवी मनाचा नेता? पहिला प्रोमो Out!

‘बिग बॉस’च्या घरात कवी मनाचा नेता? पहिला प्रोमो Out!

लवकरच बिग बॉस मराठीच्या दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार? याची चर्चा सध्या सगळ्यांमध्ये रंगताना दिसतेय. कालच दुसऱ्या सीझनचे सुत्रसंचालक कोण असणार हे सगळ्यांसमोर आलं आणि आज बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एखादा नेता या सीझनमध्ये बघायला मिळण्याची शक्यता असल्याचं हा प्रमो बघितल्यावर कळतं.

दिग्दर्शक महेश मांजरेकर या सीझनचं सुत्रसंचालन करणार आहेत. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट पुर्ण केले.

 काय आहे प्रोमोत

प्रोमोच्या सुरूवातीला एका नेत्याची सभा आहे आणि सभेला जमलेले सगळे,’ साहेबांचा विजय आहे असं म्हणत, स्टेजवर असलेल्या नेत्याला तक्रारारी सांगतात. यावेळी नेता त्यांना कवितेच्या रूपात उत्तर देतो. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होणार असल्याचं म्हणतो. त्यानंतर बिग बॉस मराठी २ चे सुत्रसंचालक महेश मांजरेकर येतात आणि एक सुचक वक्तव्य करतात. ते म्हणतात ‘मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे हे कवी मनाचे नेते होणार का बिग बॉसचे विजेते’.

मांजरेकरांच सुचक वक्तव्य

‘मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे हे कवी मनाचे नेते होणार का बिग बॉसचे विजेते’ हे वक्तव्य करणारे महेश मांजरेकर नेमके कोणत्या नेत्याविषयी बोलत आहेत असे तर्कवितर्क लावायला सुरूवात झाली आहे. साधारण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी मिळता जुळता हा प्रोमो आहे. कवितेच्या रूपात बोलण्ययाची त्यांची सवय या प्रमोत वापरण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये रामदास आठवले दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

First Published on: April 21, 2019 4:03 PM
Exit mobile version