बिग बॉस २ ; ‘करो और थोडा इंतजार’!

बिग बॉस २ ; ‘करो और थोडा इंतजार’!

बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जे फॅन्स या सीझनची आतुरतेने वाट बघत होते त्यांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. या सीझनची तारीख पुढे ढकलून २१ एप्रिल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीमुळे बिग बॉस मराठी २ ची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

बिग बॉस मराठी २ ,19 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. सिझनच्या स्पर्धकांना आणि पहिल्या सिझनमधील स्पर्धकांनाही माहिती देण्यात आली होते. त्यासाठी याचे चित्रीकरण 17 आणि 18 मे ला होणार होते. पण आता बिग बॉस मराठी 26 मे ला सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचे चित्रीकरण 24 आणि 25 मे ला होईल. लोकसभेचा निकाल 23 मे ला जाहीर होणार असल्याने बिग बॉस मराठीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

 टीआरपी वर होऊ शकतो परिणाम

लोकसभेच्या निकालामुळे नाईटच्या टिआरपीमध्ये फरक पडू नये यासाठी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीपर्यंत सगळीकडे निवडणूकीचीच चर्चा आहे. २३ तारखेला निकाल असल्यामुळे कोणाची सत्ता येणार हे बघण्यात प्रेक्षकांना जास्त रस आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम होऊ नये यासाठी हा सीझन पुढे ढकलण्यात आला आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण आता दुसऱ्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात नव्हे तर गोरेगाव फिल्मसिटीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी तिथे सध्या सेट बांधण्याचे काम सुरू आहे. बिग बॉस मराठीमध्ये कोण कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोंमधून लोकांना याविषयी हिंट देण्यात आली आहे. परंतु, नावांची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आली नाही. परंतु, आता काही कलाकारांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे,अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांचा समावेश आहे. परंतु, या नावांवर अद्याप ‘बिग बॉस’ मराठीच्या टीमकडून शिक्कामोर्तब झालेलं नाही.

First Published on: May 10, 2019 12:49 PM
Exit mobile version