सई – पुष्करने दिली प्रेमाची कबुली

सई – पुष्करने दिली प्रेमाची कबुली

सौजन्य- Voot

मराठी बिग बॉसचे पहिले पर्व आता अंतिम टप्प्यात आले आहे. साधारण गेल्या १०० दिवसांपासून बिग बॉ़सच्या घरात अनेक धमाकेदार गोष्टी घडल्या, अनेक चढ-उतार आले. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेक्षकांची बारीक नजर होती. आजवर कोणी कोणाशी पंगा घेतला, कोण कोणाच्या मागे काय बोललं इथपासून ते कोण आपल्या प्रियजनांच्या आठवणीत रडलं आणि कोणी आपल्या प्रेमाची कबुली दिली.. इथपर्यंत सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक हालचालीवर प्रेक्षकांचं बारीक लक्ष असल्यामुळे, एखादा बदल त्यांच्या लगेच लक्षात येतो. सई लोकुर आणि पुष्कर जोग यांच्यासोबतही काहीसं असंच घडलंय.

लग्न झालं नसतं तर…

बिग बॉसच्या घरामध्ये नुकतीच प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना या दोघांनीही एकमेकांविषयीच्या प्रेमाची कबुली दिली. पत्रकार परिषदेमध्ये ‘पुष्कर अविवाहीत असता तर त्याने सईकडे अशाचप्रकारे मैत्रीण म्हणून बघितलं असतं का?’ असा प्रश्न सईला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सई आणि पुष्करने त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. या प्रश्नाचं उत्तर देताना पुष्कर म्हणाला, की ”माझं लग्न नसतं झालं तर मी नक्की सईचा विचार केला असता.” याच प्रश्नावर सई म्हणाली, ”पुष्करचं लग्न झालं नसतं तर तो नक्कीच माझा नुसता मित्र नसता”.

सौजन्य- Voot

हेल्दी फ्लार्टिगची चर्चा

मराठी बिग बॉसच्या सुरुवातीच्या दिवसांत रेशम आणि राजेशच्या वागण्याची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर चर्चा रंगली ती सई आणि पुष्करच्या हेल्दी फ्लार्टींगची. सई- पुष्करचं हेल्दी फ्लर्टिंग प्रेक्षकांना केवळ घरातच नाही तर टास्कमध्येही पाहायला मिळालं. त्यामुळे हळूहळू हे फ्लर्टिंग नसून काहीतरी वेगळं असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र, अखेर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलीच. आज रात्री ९:३० वाजता या विशेष भागाचं प्रक्षेपण होणार आहे.

सौजन्य- Voot
First Published on: July 19, 2018 4:26 PM
Exit mobile version