बिग बॉसमध्ये रंगणार ‘पत्रकार परिषद’

बिग बॉसमध्ये रंगणार ‘पत्रकार परिषद’

(फोटो सौजन्य : कलर्स मराठी)

मराठी बिग बॉसच्या घरामध्ये बुधवारी आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले. पण, बिग बॉस यांनी सदस्यांना त्यांच्यावरचे आरोप खरे आहेत की खोटे हे इतर सदस्यांना आणि प्रेक्षकांना पटवून देण्याची संधी दिली.

आरोप-प्रत्यारोप या कार्यात तिकीट टू फिनाले मिळविल्यानंतर अंतिम फेरीतले खेळाडू पुष्कर या कार्यामध्ये न्यायाधीश आणि आस्ताद आरोपीच्या विरोधातला वकील बनला. ज्यामध्ये मेघावर बरेच आरोप केले गेले. ज्यामुळे मेघा, पुष्कर आणि सईमध्ये बरेच वाद झाले. कार्यानंतर बिग बॉस यांनी फाईनलिस्टची नावे घोषित केली. ज्यामध्ये सईचे नाव न घेतल्याने पुष्कर, मेघा आणि सईला खूप मोठा धक्का बसला. परंतु थोड्यावेळातच बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहा फाईनलिस्ट असतील, असे घोषित केले आणि सगळ्यांनीच घरामध्ये आनंद व्यक्त केला. तसेच आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पत्रकार परिषद रंगणार आहे. ज्यामध्ये सदस्य पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

पत्रकारांशी संवाद

आज बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांची पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यामध्ये मेघा, आस्ताद, शर्मिष्ठा, सई, पुष्कर आणि स्मिता यांना बरेच प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्याची उत्तरे सदस्यांना द्यायची आहेत. या पत्रकार परिषदेची सांगता आस्ताद काळेच्या गाण्याने होणार आहे. तर घरातील सदस्यांना पत्रकारांना बघून खूपच आनंद होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आज कळणार कोण आहे फेक आणि कोण आहे रिअल? घरातून बाहेर पडल्यावर सदस्यांना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? कोणाला भेटायचे आहे? मेघा का बोलली खोट? त्यामुळे आजचा भाग बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

First Published on: July 19, 2018 3:51 PM
Exit mobile version