मुलगी झाली हो, बिपाशाने दिला गोंडस मुलीला जन्म

मुलगी झाली हो, बिपाशाने दिला गोंडस मुलीला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसूने काही वेळापूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा वयाच्या 43 व्या वर्षी आई झाली आहे. बिपाशा आई झाल्याची बातमी कळताच तिचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार देखील तिला अनेक शुभेच्छा देत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीर आई-बाबा झाले. त्यांच्या नंतर या लिस्टमध्ये आता बिपाशा-करणचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

बिपाशा-करणच्या घरी आली गोंडस परी
बिपाशाच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे बिपाशा-करणवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लहानग्या परीच्या येण्याने बिपाशा-करणचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे.

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न
बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.

 


हेही वाचा :

बाळाला भेटण्यासाठी कोव्हिड चाचणी अनिवार्य! आलिया-रणबीरने घेतला निर्णय

First Published on: November 12, 2022 3:52 PM
Exit mobile version