घरमनोरंजनबाळाला भेटण्यासाठी कोव्हिड चाचणी अनिवार्य! आलिया-रणबीरने घेतला निर्णय

बाळाला भेटण्यासाठी कोव्हिड चाचणी अनिवार्य! आलिया-रणबीरने घेतला निर्णय

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कपूर कुटुंबात गेल्या रविवारी एका गोंडस परीने जन्म घेतला. आलिया-रणबीरच्या मुलीचा जन्म झाल्यापासून सर्व कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. फक्त कपूर कुटुंबातच नाही तर बॉलिवूड आणि आलिया-रणबीरचे चाहते देखील या बातमीने आनंदी आहेत. आलिया-रणबीरचे चाहते त्यांच्या मुलीबाबत नवनवीन बातमी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी आलियाने आपल्या मुलीसह गृहप्रवेश केला.

आलिया-रणबीरच्या मुलीला पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारही उत्सुक आहेत. आलिया हॉस्पिटलमध्ये असताना तिला अनेक बॉलिवूड कलाकारा भेटायला गेले होते. पण आता आलिया घरी आल्यानंतर कपूर कुटुंबाने बाळासाठी एक कठोर नियम आखला आहे. बाळाला भेटण्याआधी कोविड चाचणी करुन ती निगेटिव्ह आहे की नाही हे पाहिले जाईल आणि मगच बाळाला भेटण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं सांगितले आहे.

- Advertisement -

खरंतर, अजूनही कोरोना माहामारी पूर्ण पणे गेलेली नाही. अशा वातावरणात बाळाला काही त्रास होऊ नये अशी आलिया-रणबीरयाची इच्छा आहे. त्त्यांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

6 नोव्हेंबरला झाला मुलीचा जन्म

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आलियाने 6 नोव्हेंबरला मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरने एका पोस्टद्वारे मुलीच्या जन्माची घोषणा केली. मुलीच्या जन्माबाबत आलियाने लिहिले की, “आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी. आमची मुलगी आली आहे.. ही जादुई मुलगी आहे.”

जून महिन्यात दिली होती गोड बातमी
यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.

 


हेही वाचा :

मुलीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीर झाला भावूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -