Birthday Special: मिका सिंगच्या गाण्यातील स्मृती इराणींना ओळखलत का?

Birthday Special: मिका सिंगच्या गाण्यातील स्मृती इराणींना ओळखलत का?

Birthday Special: मिका सिंगच्या गाण्यातील स्मृती इराणींना ओळखलत का?

मॉडेलिंगपासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत आपली छाप सोडणाऱ्या केंद्रीय मंत्री म्हणजे स्मृती इराणी. आज त्यांच्या आयुष्यातील खूप स्पेशल दिवस आहे. २३ मार्च १९७६ रोजी स्मृती इराणी यांचा जन्म झाला होता. एका झगमगत्या दुनियेतून असून सुद्धा स्मृती इराणी राजकारणाच्या मैदानात उतरल्या. दोन्ही क्षेत्रात देखील त्यांनी आपली कुवत सिद्ध करून दाखवली. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने थ्रोबॅक व्हिडिओ पाहूयात ज्यात तुम्हाला स्मृती इराणींना ओळखणे कठीण आहे.

वयाच्या २१ व्या वर्षी स्मृती इराणी यांनी ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडिया (१९९८) मध्ये भाग घेतला होता. या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकला त्या वेळेच्या स्मृती इराणी आत्मविश्वासाने रॅमवॉक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्मृती इराणी सांगत आहे की, ‘त्या इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी घेत आहेत. त्यांना स्पोर्ट्स-एडवेंचर्स आवडतात. शिवाय त्यांना राजकारण देखील रुची असल्याचे म्हणत आहेत.’ अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासून स्मृती इराणी यांनी राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन उघड केला होता.

स्मृती इराणी दिसल्या मिका सिंगच्या गाण्यात

ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेतल्यानंतर स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. मालिकेत पदार्पण करण्यापूर्वी त्या मिका सिंगसोबत एका म्युझिक व्हिडिओ ‘बोलियां’मध्ये दिसल्या होत्या. या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी गोल्डन आउटफिटमध्ये दिसत आहेत. आताच्या स्मृती इराणी आणि पहिल्यांच्या स्मृती इराणी यांच्यामध्ये मोठा बदल झाल्याचा दिसून येतो. जुन्या फोटोमध्ये स्मृती इराणींना ओळखणे खूप अवघड आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील स्मृती इराणी यांचे तुलसी वीरानींची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. त्यांना तुलसी नावानेच लोकं ओळखत होते. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेसाठी त्यांना ५ इंडियन टेलिव्हिजन अॅकडेमी अवॉर्ड्स, ४ इंडियन टेली अवॉर्ड्स आणि ८ स्टार परिवार अवॉर्ड्स मिळाले होते.


हेही वाचा – कंगनाच्या वाढदिवस दिनी ”थलायवी” चा ट्रेलर प्रदर्शित


 

First Published on: March 23, 2021 11:58 AM
Exit mobile version