Birthday Special: ‘या’ डायलॉगमुळे बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचं नशीब बदललं

Birthday Special: ‘या’ डायलॉगमुळे बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचं नशीब बदललं

Birthday Special: 'या' डायलॉगमुळे बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचं नशीब बदललं

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आज ३०वा वाढदिवस आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात कार्तिक आर्यनचा जन्म झाला. लहानपणा पासून कार्तिकला Actor बनवण्याची इच्छा होती. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला.  मुंबईत आल्यानंतर त्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागले. आता कोटी रुपये कमवणारा कार्तिक तेव्हा १२ लोकांसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होता.

कार्तिकचे वडील मनीष तिवारी आणि आई प्रगती तिवारी दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचे दूर-दूर पर्यंत या फिल्मी दुनियेशी संबंध नव्हते, तरी पण आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि कोणाच्याही मदतीशिवाय कार्तिक आज एक यशस्वी अभिनेता झाला आहे.

कार्तिक अभिनयाचे स्वप्न उराशी घेऊन मुंबईत आला आणि त्याने एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कार्तिक दररोज ऑडिशन द्यायला जात होता. त्यावेळी कार्तिक १२ जणांसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होता. तीन चित्रपट केल्यानंतर तो या १२ लोकांसोबत राहत होता.

कार्तिकला पहिला चित्रपट फेसबुकच्या माध्यमातून मिळाला होता. दिग्दर्शक लवु रंजनने फेसबुकवर कार्तिक एक फोटो पाहिला होता. ज्यानंतर कार्तिकला आपल्या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला सांगितले. यानंतर कार्तिकने ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटावर साईन केले.

‘प्यार का पंचनाम’ चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त अजून दोन अभिनेते होते. पण कार्तिकच्या पाच मिनिटांच्या मोनोलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्तिकने हा चित्रपट हिट झाल्यानंतर सांगितले होते की, ‘हा ५.२९ मिनिटांचा मोनोलॉग आठवणीत ठेवण्यासाठी पाच दिवस लागले होते. हा मोनोलॉग फक्त दोन टेक बोलला होता.’


हेही वाचा – भारती सिंह पाठोपाठ पती हर्षलाही एनसीबीकडून अटक


 

First Published on: November 22, 2020 12:19 PM
Exit mobile version