…त्यापेक्षा भुकेलेल्या माणसाला जेवण द्या; शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला भाजपा नेत्याचा विरोध

…त्यापेक्षा भुकेलेल्या माणसाला जेवण द्या; शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला भाजपा नेत्याचा विरोध

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

या गाण्याला सोशल मीडियावर अनेकांना उत्तम प्रतिसाद दिला, तर काहींना गाण्यातील बोल्ड सीन्समुळे चित्रपटाला ट्रोल करायला सुरुवात केली. अशातच आता एका भाजपा नेत्याने या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्यावर विरोध केला आहे. इंदूरचे भाजपा खासदार रमेश मेंदोला यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असून त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत लिहिलंय की, “या चित्रपटाला 200-300 रुपयांचं तिकीट खरेदी करण्यापेक्षा एखाद्या भुकेलेल्या व्यक्तिला अन्न दिलेलं चांगलं. तुम्हाला पुन्हा आठवण करुन देतो या चित्रपटामध्ये दीपिका देखील आहे जी पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदू, शीख आणि ईसायांना नागरिकता देण्यासाठी विरोध करत होती.”

 


हेही वाचा :

बॉलिवूड गाणी इन्स्टाग्राम रील्ससारखी…; ‘बेशरम रंग’ गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची टीका

First Published on: December 15, 2022 9:52 AM
Exit mobile version