अभिनेता आसिफ बसरा यांची ‘जब वी मेट ते ‘होस्टेजेस’ पर्यतची कारकिर्द

अभिनेता आसिफ बसरा यांची ‘जब वी मेट ते ‘होस्टेजेस’ पर्यतची कारकिर्द

अभिनेता आसिफ बसरा यांची 'जब वी मेट ते 'होस्टेजेस' पर्यतची कारकिर्द

बॉलिवुड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. गुरूवारी आसिफ बसरा यांनी धरमशाला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आसिफ बसरा यांचे सिनेसृष्टीतील योगदानही मोलाचे ठरले आहे. ‘काय पो छे’ पासून अमेरिकी कॉमेडी फिल्म आउटसोल्ड पर्यंत आसिफ यांनी आपल्या जिवनात अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम केले आह. निर्माता, दिग्दर्शक याचबरोबर त्यांनी अनेक हिंदी सिनेमातही काम केले आहे.

आसिफ बसरा यांनी १९९८ मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘वो’ नावाच्या एका टिव्ही सिरिअलमध्ये त्यांनी पहिल्यांदा काम केले होते. आसिफ बसरा यांना खऱ्या अर्थाने नाव मिळाले ते म्हणजे अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्राइडे आणि राहुल ढोलकियाचा ‘परजानिया’ या सिनेमातून. या दोन्ही सिनेमातून आसिफ बसरा यांना मोठे नाव मिळाले. आसिफ यांनी प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. होस्टेजेस ही त्यांची शेवटीची वेब सीरिज ठरली.

हिंदीसह त्यांनी अनेक हॉलिवुड सिनेमातही त्यांनी काम केले आहे. हॉलिवुडमधील आऊटसोर्स या कॉमेडी सिनेमात आसिफ यांनी काम केले आहे. त्याचबरोबर मायकेल ओ. सजेबलँड यांच्या वन नाइट विथ द किंग या सिनेमातही आसिफ यांनी काम केले आहे.

शाहिद कपूरचा जब वी मेट, अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा काय पो छे त्याचबरोबर राणी मुखर्जीचा हिचकी या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता. त्याचबरोबर क्रिश३, कालाकांडी यासारख्या दर्जेदार सिनेमातही त्यांनी काम केले होते. अजय देवगणच्या वन्स अपोन ए टाइम इन मुंबई या सिनेमात हिमरान हाशमीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

सिनेमा बरोबरच आसिफ बसरा यांनी हिंदी नाटकही गाजवले आहेत. ‘महात्मा वसेस गांधी’ या नाटकातही त्यांनी काम केले होते. या नाटकात आसिफ यांनी ५ वेगवेगळी पात्र साकारली होती. भारतातील सर्वात यशस्वी नाटक म्हणून हे नाटक मोजले जाते. काही दिवसांपूर्वी पाताल लोक या वेब सिरिजमधूनही आसिफ बसरा दिसले होते. तर होस्टेजेस ही त्यांची शेवटीची वेब सीरिज ठरली.

First Published on: November 12, 2020 9:54 PM
Exit mobile version