बॉलिवूडला अजून एक धक्का: अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

बॉलिवूडला अजून एक धक्का: अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

अभिनेता आसिफ बसरा यांची 'जब वी मेट ते 'होस्टेजेस' पर्यतची कारकिर्द

बॉलिवूडचे अभिनेते आसिफ बसरा यांनी धरमशाला मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडला आता आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. सध्या या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथील खडा डंडा रोडवरील राहत्या घरी आसिफ बसरा यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून आसिफ हे धरमाशाला येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. माहितीनुसार, युकेच्या एका महिलेबरोबर ते लिव्ह-इनमध्ये राहत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आज दुपारी आपल्या आसिफ बसरा हे पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. पण घरी गेल्यानंतर कुत्र्याच्याच दोरीने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे एक पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील हरहुन्नरी आणि अष्टपैलू कलाकाराचा अशा अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

५३ वर्षीय आसिफ बसरा यांनी ‘काय पो छे’, ‘वन्स अपऑन ए टाईम इन मुंबई’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘परजानिया’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. हॉलिवूडमधील ‘आउटसोर्स’ चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. १९९८ साली त्यांच्या ‘वो’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. मग त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं.


हेही वाचा – ‘आश्रम’मधली अभिनेत्री अनुप्रियासोबत आध्यात्मिक गुरुने केले होते वाईट कृत्य!


 

First Published on: November 12, 2020 4:49 PM
Exit mobile version