सुशांतच्या कुटुंबियांना साथ द्या, भाईजानने चाहत्यांना केली विनंती

सुशांतच्या कुटुंबियांना साथ द्या, भाईजानने चाहत्यांना केली विनंती

सुशांतच्या कुटुंबियांना साथ द्या, भाईजानने चाहत्यांना केले विनंती

बॉलिवूड हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. एकीकडे लोक अभिनेता निघून गेल्याचे दुःख व्यक्त करीत आहेत तर दुसरीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधत आहे. यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील ट्रोल होत आहे. याबाबत सलमानने स्वतः सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानने एक ट्विट करून सर्वांना सुशांतच्या कुटुंबियांसोबत राहण्याची विनंती केली आहे. सलमानने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना सुशांतच्या चाहत्यांसोबत उभे राहा आणि चुकीची भाषा वापरू नका अशी विनंती करतो. भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या संकटाच्या वेळी सुशांत कुटुंबाला साथ दिली पाहिजे. आपल्या व्यक्तीला गमावणं हे खूप वेदनादायी असतं.’

सुशांतच्या आत्महत्येनंतर गेल्या अनेक दिवसांत अनेक प्रकारचे आरोप सलमान खानवर झाले आहेत. ‘दबंग’ दिग्दर्शक अभिनव कश्यप याने देखील सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप लावले होते. अभिनव याने आपले करिअर उद्धवस्त केल्याचा आरोप देखील सलमानवर लावला आहे. अलीकडेच प्रसिद्ध गायक सोनू निगमनेही सलमानवर निशाणा साधला आहे.

रविवारी १४ जूनला दुपारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केला. या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच अभिनेत्याशी संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची देखील पोलिसांनी चौकशी केली होती.


हेही वाचा – आत्महत्येला समजून घेताना…


 

First Published on: June 21, 2020 4:02 PM
Exit mobile version