महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकार भावूक

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकार भावूक

ब्रिटिश राजघराण्याच्या मानाच्या गादीवर गेली सात दशके विराजमान असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.दरम्यान, आता एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांकडून देखील शोक व्यक्त केला जात आहे.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त
बॉलिवूड कलाकारांपैकी अभिनेता रितेश देशमुख,सुष्मिता सेन, सेलिना जेटली, शिल्पा शेट्टी, करीना कपूर खान, नीतू कपूर, गीता बसरा, अदनान सामी यांसारख्या स्टार्सनी सोशल मीडियावर ट्विट करून राणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ट्विट करून लिहिलंय की, “किती छान आयुष्य आहे. त्यांनी रंगांवर प्रेम केले आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छटा एकाच आयुष्यात जगल्या…त्याच्या आत्म्याला शांती लाभो.”

दरम्यान, 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांच्या प्रिन्स चार्ल्स या मुलाचा जन्म झाला. दरम्यान मागील वर्षी 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले.


ब्रिटनच नाही तर ‘या’ 14 देशांच्या राणी होत्या एलिझाबेथ द्वितीय

First Published on: September 9, 2022 10:57 AM
Exit mobile version