गांजाची शेती करणाऱ्यांवरून देसी गर्ल झाली ट्रोल

गांजाची शेती करणाऱ्यांवरून देसी गर्ल झाली ट्रोल

गांजाची शेती करणाऱ्यांवरून देसी गर्ल झाली ट्रोल

मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींसह प्रियांका चोप्राने देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगमुळे प्रियांका ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. दरम्यान प्रियांका चोप्रा न्यूयॉर्क स्थायित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांची वेदना ती समजू शकत नाही, असे सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलना संबंधित प्रियांकाने केलेले ट्विट हे फेक आणि ओव्हर Acting असल्याचे युजर्स म्हणत आहेत.

प्रियांका चोप्राने आपल्या ट्विटमध्ये शेतकऱ्यांना भारतीय सैनिक म्हटले आणि त्यांच्या अपेक्षा साध्य होण्याबाबत ती बोलली. प्रियांकाने ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘आपले शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती दूर करण्यासाठी गरज आहे. त्यांचा अपेक्षा पूर्ण होणे आवश्यक आहे. एक संपन्न लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, हे संकट लवकरात लवकर दूर होईल.’

या ट्विटमुळे प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. युजर्स प्रियांका चोप्राविषयी काय म्हणाले वाचा….


हेही वाचा – कंगना रनौत ‘भारत बंद’वर म्हणते, ‘आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू’


 

First Published on: December 8, 2020 4:17 PM
Exit mobile version