‘निशिकांत कामत जिवंत आहे, मृत्यूशी झुंज देतोय’, रितेश देशमुख

‘निशिकांत कामत जिवंत आहे, मृत्यूशी झुंज देतोय’, रितेश देशमुख

मदारी फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. सगळीजणं त्यांना श्रध्दांजली वाहत आहेत. मात्र आता अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विट करत निशिकांत कामत जिवंत असल्याचं म्हटलं आहे. निशिकांत कामत जिवंत आहेत. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूयात अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलं आहे.

एकीकडे माध्यमांमध्ये निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी आली. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रीयाही दिल्या. मात्र आता रितेश देशमुख यांनी केलेल्या या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अनेक कलाकारांनी देखील निशिकांत कामत यांना श्रध्दांजली वाहिली होती. अभिनेत्री रेणूका शाहणे यांनी देखील निशीकांत काम यांना आधी श्रध्दांजली वाहिली पण नंतर त्यांनी आपली चूक दुरूस्त केली. त्यांनी निशिकांत यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निशिकांत ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

First Published on: August 17, 2020 1:39 PM
Exit mobile version