सलमान खानने ईदपूर्वीच आऊट केला अजय देवगवच्या ‘Runway 34’ चा टीझर

सलमान खानने ईदपूर्वीच आऊट केला अजय देवगवच्या ‘Runway 34’ चा टीझर

सलमानने ईदपूर्वीच आऊट केला अजय देवगवच्या 'Runway 34' चा टीझर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने यंदा ईदच्या मूहुर्तावर कोणताही चित्रपट आणणार नसल्याची घोषणा केली. मात्र याप्रसंगी त्याने अजय देवगणच्या आगामी चित्रपटाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जो चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘रनवे 34’ (Runway 34) चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने चाहत्यांना ईदला अजय देवगणचा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
सलमान खानने हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘रनवे 34’ च्या ट्रेलरची रिलीज डेट शेअर करत सलमान खानने चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. यावर त्याने लिहिले की ‘माझा कोणताही चित्रपट अद्याप तयार नसल्यामुळे, मी माझा भाऊ अजय देवगणला विनंती केली आहे की, मी ईदला येऊ शकतो का ईदी द्यायला. चला ही ईद साजरी करूया आणि पाहूया #Runway34 #Runway34Teaser आऊट! #Runway34OnApril29’

सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या 48 सेकंदाच्या टीझर व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत एका फ्लाइटमध्ये बसलेले दिसत आहेत. या दृश्यात अजयच्या चेहऱ्यावर भीती आणि त्रास स्पष्टपणे दिसतोय. यावेळी फ्लाईट वादळाच्या मध्यातून जात असते ज्यावर अजय देवगण म्हणतो की, आम्हाला अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची झलकही दाखवण्यात आली आहे. टीझरच खूपच मनोरंजक असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकचं वाढली आहे.

टीझर व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाजाने देखील चार चाँद लावले आहे. ते म्हणतायत की, ‘गुरुत्वाकर्षण.. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी’. वस्तू जितक्या वेगाने वर जाते तितक्या वेगाने खालीही येते. अमिताभ बच्चनचा आवाज आणि अजय देवगणचा लूक तुम्हाला चित्रपटाच्या ट्रेलरसाठी आणखीनच उत्सुक करते. या चित्रपटाचा ट्रेलर 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार असून 29 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरस्टार अजय देवगणनेच केले असून तो मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. तर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अभिनेत्री राकुल प्रीत सिंग, कॅरी मिनाटी, बोमन इराणी आणि आकांक्षा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


काश्मिर पंडिताची पत्नी या नात्याने सांगते, आता प्रत्येकाने….; यामी गौतमीचे The Kashmir Files ला समर्थन

First Published on: March 15, 2022 4:22 PM
Exit mobile version