सुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

सुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

सुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी नवी पाहुणी आल्याची गोड बातमी समोर आली आहे. सुष्मिता सेनची वहिणी आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारुने ही गोड बातमी दिली आहे. चारुने एका गोंडस मुलगी जन्माला घातली आहे. या गुड न्यूजची माहिती स्वतः चारुने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे. चारुने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.

काही वेळापूर्वी चारुने आपल्या चिमुकल्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसाठी शेअर केली. या फोटोंमध्ये रुग्णालयात चारु आपल्या चिमुकल्या मुलीला खुशीत घेतलेली दिसत आहेत. तसेच चारुचा पती राजीव सेन देखील फोटोमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पती राजीव चारुला किस करताना दिसत आहे. त्याने लिहिले आहे की, ‘एका मुलीचे आई-वडील होण्याचा आनंद. तुम्ही केलेल्या प्रार्थंनासाठी सर्वांचे धन्यवाद. देवाचे आभार’

२०१९मध्ये चारुने सुष्मिता सेनचा छोटा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले होते. दोघांच्या ग्रँड वेडिंगला अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत राहिले होते. माहितीनुसार, दोघांनीही तीन वेळा केले. पहिल्यांदा लग्न गोव्याला झाले, त्यानंतर राजस्थानी परंपरेनुसार दुसऱ्यांदा लग्न केले आणि पुन्हा रजिस्टर्ड मॅरिज केले होते.


हेही वाचा – यातील राज कुंद्रा कोणता? श्वानांसोबतच्या फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल


First Published on: November 1, 2021 7:36 PM
Exit mobile version