घरमनोरंजनयातील राज कुंद्रा कोणता? श्वानांसोबतच्या फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल

यातील राज कुंद्रा कोणता? श्वानांसोबतच्या फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या फिटनेस आणि अभिनयामुळे चर्चेचा विषय असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मितीमुळे चर्चेत आली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणातून राज कुंद्रा जामीनावर बाहेर आला असला तरी शिल्पा आणि राजला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. सोशल मीडियावर शिल्पाने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केला की, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. अशातच शिल्पाने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवरून शिल्पाला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले. एका भटक्या श्वानासोबत फोटोशूटवरून शिल्पाला ट्रोल केले जातेय.

शिल्पाने श्वानांसोबत काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून शिल्पाचा तो फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा फिल्मसिटीमधील रस्त्यावर बसलेल्या श्वानांसोबत फोटो क्लिक करताना दिसतेय. या फोटोवर काही चाहत्यांनी प्राणीप्रेमी म्हणत प्रेमाचा वर्षाव केला आहे, तर काहींनी शिल्पाला ट्रोल केलेय. या ट्रोलिंगमध्ये अनेकांनी राज कुंद्राच्या नावाचाही स्पष्ट उल्लेख केलाय.

- Advertisement -

एका यूजरने या फोटोवर कमेंट्स करत लिहिले की, ‘राज कुंद्रालाही शिकवा’. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, ‘पतीनेही काही प्रशिक्षण घेतले असते तर…’, ‘यापैकी राज कुंद्रा कोण आहे?’ असा प्रश्नांचा भडीमार करत ट्रोल केले आहे.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिल्पाच्या पतीला जुलैमध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक व्यक्तींनी समोर येत धक्कादायक खुलासे केल्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर बनले. मात्र न्यायालयाने जामीनावर राज कुंद्राची सुटका केली. मात्र अद्यापही हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -